NewsNation Online

FireFly In News

राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश ; नियमितपणे आढावा, समन्वय साधणार

मुंबई, दि. ६ : राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतील कामांचा नियमितपणे आढावा घेऊन, त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील.

राज्यातील पाच ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. या आराखड्यांची अंमलबजावणी वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने व्हावी या करिता या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे कार्यक्षेत्र:

  • भीमाशंकर (जि. पुणे) – सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा
  • घृष्णेश्वर (जि. छत्रपती संभाजीनगर) – उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी
  • त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री. सौरभ विजय
  • औंढा नागनाथ (जि. हिंगोली) – वित्त विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती रिचा बागला
  • परळी वैजनाथ (जि. बीड) – इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव श्री. आप्पासाहेब धुळाज

विकास आराखड्यांतील निधी आणि कामे:

  • भीमाशंकर: १४८.३७ कोटी रुपये – सुमारे ११ कामांना मंजुरी
  • घृष्णेश्वर: १५६.६३ कोटी रुपये
  • त्र्यंबकेश्वर: २७५ कोटी रुपये – विविध कामांना मंजुरी
  • औंढा नागनाथ: १५.२१ कोटी रुपये
  • परळी वैजनाथ: २८६.६८ कोटी रुपये – ९२ कामांना मंजुरी

या पद्धतीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित अधिकारी समन्वय साधणार आहेत. मंत्रालयीन स्तरावरून समन्वय व संनियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे.


Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
Rashmi Bagdi
Rashmi Bagdi is a journalist and digital content creator associated with NewsNation Online. She specializes in reporting on local news, civic issues, education, government updates, and viral stories with a reader-focused approach.

Discover more from NewsNation Online

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading