NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

माता चंद्रघंटेच्या रूपात प्रशासकीय शक्तीचा सन्मान; जालना मनपा आयुक्त अंजली शर्मा यांचा गौरव

Navratri felicitation ceremony at Jalna Municipal Corporation commissioner's office
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

जालना/प्रतिनिधी : नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी इंटरनॅशनल वैश्य फेडरेशनच्या महाराष्ट्र अग्रवाल युवा प्रकोष्ठातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नवरात्राच्या तिसऱ्या माळेला जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष श्लोक अग्रवाल आणि युवा नेते ॲड. महेश धन्नावत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

तिसऱ्या माळेचे महत्त्व : माता चंद्रघंटा

नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते. ही देवी शांती, शौर्य, जागरूकता आणि न्यायप्रियतेचे प्रतीक मानली जाते. तिच्या कपाळावरील घंटेच्या आकाराचा चंद्र सतर्कतेचे प्रतीक आहे. या संकल्पनेशी प्रशासकीय नेतृत्वाची सांगड घालून आयुक्त शर्मा यांचा गौरव करण्यात आला.

ॲड. महेश धन्नावत यांचे मत

“तिसऱ्या माळेची चंद्रघंटा देवी ही शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय शक्ती आहे. अगदी त्याचप्रमाणे आयुक्त अंजली शर्मा यांनी शहरातील अतिक्रमण, अस्वच्छता आणि बेशिस्त कारभाराविरुद्ध घंटानाद करून शिस्त प्रस्थापित करण्याचे काम केले आहे. त्यांची प्रशासनातील सजगता, कठोर निर्णयक्षमता आणि नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता ही चंद्रघंटा देवीच्या रूपासारखीच आहे. त्यामुळे या दिवशी त्यांचा गौरव करणे अत्यंत संयुक्तिक आहे.”

श्लोक अग्रवाल : नऊ माळा, नऊ प्रेरणादायी महिला

“नवरात्रोत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर समाजातील जिवंत देवीस्वरूप असलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम करण्याचा उत्सव आहे. आयुक्त अंजली शर्मा यांनी अल्पावधीतच जालना शहराच्या विकासाला एक नवी दृष्टी आणि गती दिली आहे. प्रशासकीय सेवेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात एक महिला जेव्हा इतक्या प्रभावीपणे नेतृत्व करते, तेव्हा ती हजारो मुलींसाठी प्रेरणा बनते. आमच्या युवा प्रकोष्ठाचा उद्देशच हाच आहे की, नऊ माळांमध्ये नऊ वेगवेगळ्या क्षेत्रातील अशा रणरागिणींना समोर आणून महिला सक्षमीकरणाचा खरा संदेश समाजात पोहोचवावा.”

नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून महिला नेतृत्व, सार्वजनिक सेवा आणि समाजातील सकारात्मक योगदानाची दखल घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.


Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw Lawyer.

Discover more from NewsNation Online

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading