NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

जलसंधारण कागदावरच? मूर्तींच्या उंचीचा विषय महासभेत नाही; आता दंडात्मक इशाराही कागदावरच राहणार का?

A dripping tap and empty water vessel in a drought-stricken landscape, with Ganesh and Durga idols in the background
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

जालना : पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याची वेळ आली असताना जालना महानगरपालिकेच्या जलसंधारणविषयक भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नासाडी, अनधिकृत नळजोडण्या आणि पिण्याच्या पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी आता ५ हजार, १० हजार आणि २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयुक्त अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याची भूमिका जाहीर केली आहे. मात्र, पाणी वाचविण्याचा विचार केवळ दंडाच्या घोषणांपुरता मर्यादित राहणार का, हा खरा प्रश्न आहे.

याच महानगरपालिकेसमोर Adv. महेश धन्नावत यांनी गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवात मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे होणारा पाण्याचा वापर लक्षात घेऊन मूर्तींच्या उंचीवर मर्यादा घालण्याचा मुद्दा मांडला होता. या विषयासंदर्भात त्यांना पत्रही देण्यात आले; मात्र हा महत्त्वाचा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला नाही. पाणीटंचाईची शक्यता, जलसाठ्यांवरील ताण आणि भविष्यातील गरज लक्षात घेता हा विषय वेळेत चर्चेला येणे अपेक्षित होते. पण पत्रव्यवहार झाला आणि विषय सभेतच आला नाही, ही बाब नागरिकांच्या मनात खंत निर्माण करणारी आहे.

आता अनधिकृत नळजोडण्या, जलवाहिन्यांतील गळती, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय, वाहन धुणे किंवा रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे अशा बाबींवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून अनधिकृत जोडणीद्वारे पाणीचोरी किंवा सार्वजनिक पाण्याचा अपव्यय केल्यास पाच हजार रुपयांचा दंड, दुसऱ्यांदा दहा हजार आणि तिसऱ्यांदा पंचवीस हजार रुपये दंड तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते, असे वृत्तात नमूद आहे. घरगुती नळजोडणी, नळ, तोट्या आणि अंतर्गत जलवाहिन्यांतील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

यह भी पढ़ें: क्या जल संरक्षण सिर्फ कागजों तक सीमित? मूर्तियों की ऊंचाई का मुद्दा महासभा में नहीं, अब नए आदेशों पर भी सवाल

मात्र, जलसंधारण म्हणजे केवळ नागरिकांना दंडाची भीती दाखविणे नव्हे. प्रशासनाने स्वतःच्या नियोजनातही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची दूरदृष्टी दाखवली पाहिजे. सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, पाणीपुरवठा व्यवस्था, गळती नियंत्रण आणि पाण्याचा पुनर्वापर या सर्व बाबींचा एकत्रित विचार झाला पाहिजे. नागरिकांना जबाबदारीची जाणीव करून देताना प्रशासनानेही स्वतःच्या निर्णयांची आणि प्रलंबित विषयांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

Never miss a storyFollow News Nation Online on WhatsApp for breaking news from India and the world.
Follow on WhatsApp

Adv. महेश धन्नावत यांनी या विसंगतीकडे लक्ष वेधताना प्रश्न उपस्थित केला की, गणेश व दुर्गा मूर्तींच्या उंचीबाबतचा जलसंवर्धनाशी थेट संबंध असलेला मुद्दा पत्र देऊनही सर्वसाधारण सभेत मांडला गेला नाही, तर आता जलसंधारणाबाबतचे हे आवाहन आणि कठोर कारवाईचे आदेशही केवळ कागदावरच राहणार नाहीत, याची खात्री कोण देणार? “पाणी वाचवा” हा संदेश फलकांवर आणि प्रसिद्धीपत्रकांत दिसण्यापेक्षा निर्णयांत आणि अंमलबजावणीत दिसला पाहिजे. आजचा प्रत्येक थेंब उद्याच्या जालन्याच्या जगण्याशी जोडलेला आहे. घोषणांपेक्षा कृती, पत्रांपेक्षा निर्णय आणि इशाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी महत्त्वाची आहे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.

जालना, महाराष्ट्र और देश-दुनिया की ताज़ा खबरें
सीधे अपनी Facebook फ़ीड में पाएँ — News Nation Online पेज को Follow करें।
👍 Facebook पर Follow करें

Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw Lawyer.

Leave a Reply