लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हदगा उमरगा गावातून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पाण्याच्या एका घोटासाठी महिलांना धोकादायक परिस्थितीत कसरत करावी लागत असल्याचे वृत्त चिंताजनक आहे.
मात्र, जालन्यातील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पाणीटंचाईचा प्रश्न केवळ लातूरपुरता मर्यादित नसून ग्रामीण भागासह अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे मत ॲड. महेश धन्नावत यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात बोलताना ॲड. महेश धन्नावत म्हणाले, “पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि जीवनाचा आधार आहे. महिलांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. जालन्यातही पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन जलसंकट निवारणासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
यह भी पढ़ें: पानी की हर बूंद के लिए संघर्ष; जालना में भी हालात चिंताजनक, प्रशासन और स्वयंसेवी संस्थाएं आगे आएं : एड. महेश धन्नावत
गंभीर पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरी व बोअरवेलची उपलब्धता तपासणे, बंद पडलेले जलस्रोत दुरुस्त करणे आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पाणीटंचाई ही केवळ प्रशासनाची समस्या नसून संपूर्ण समाजासमोरील आव्हान आहे. प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केले, तर अनेक कुटुंबांचा पाण्यासाठीचा संघर्ष कमी होऊ शकतो, असे आवाहन ॲड. महेश धन्नावत यांनी केले.
सीधे अपनी Facebook फ़ीड में पाएँ — News Nation Online पेज को Follow करें।
Discover more from NewsNation Online
Subscribe to get the latest posts sent to your email.











Leave a Reply