जालना : आंतरराष्ट्रीय अग्रवाल संमेलनाच्या महाराष्ट्र विभागाच्या मराठवाडा विभागातर्फे बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जालन्यात भव्य स्नेह मिलन एवं सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता धनकुंवर कन्या विद्यालय, शोला चौक, जालना येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांना त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याबद्दल ‘बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. जालन्यात जलसंवर्धनासाठी केलेले प्रयत्न, मोतीबाग परिसराचा विकास, नागरिकांसाठी उद्यानांची निर्मिती, शहराचे सौंदर्यीकरण आणि जालन्याला विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन हा सन्मान करण्यात येणार आहे.
आयआयटी ते लोकसेवेचा प्रेरणादायी प्रवास
आयआयटी मुंबईच्या सुवर्णपदक विजेत्या अशिमा मित्तल यांचा प्रवास विशेष प्रेरणादायी आहे. उच्च शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी उपलब्ध असतानाही त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून लोकांची सेवा करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्यासाठी पदापेक्षा लोकसेवा महत्त्वाची आहे. गावोगावी जाऊन मुक्काम करणे, ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधणे, झोपडपट्टीतील प्रश्न समजून घेणे आणि प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. नाशिकमध्ये त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर ५०’ उपक्रम राबवून शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या. जालन्यातही विकासाच्या विविध उपक्रमांतून त्यांनी शहराला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
यह भी पढ़ें: भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालय के ई-मेल पर भेजा फर्जी पत्र, सोनगिरी के युवक पर मामला दर्ज
विद्यार्थिनींसाठी प्रेरणेचा क्षण
समाजाला आणखी अशिमा मित्तल यांची गरज आहे! विशेषतः धनकुंवर कन्या विद्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात त्यांचा सन्मान होणे ही केवळ एका जिल्हाधिकाऱ्याच्या गौरवाची बाब नसून शाळेतील विद्यार्थिनींसाठी प्रेरणेचा क्षण ठरणार आहे. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन मोठी स्वप्ने पाहावीत, प्रशासकीय सेवेत प्रवेश करून समाजासाठी काम करण्याचे ध्येय बाळगावे, हा संदेश या सन्मानातून मिळावा. उद्याच्या पिढीतील मुलींनी केवळ स्वतःच्या यशाचा विचार न करता समाजाच्या परिवर्तनातही योगदान देण्याची प्रेरणा घ्यावी, हाच या पुरस्कारामागील व्यापक विचार आहे.
या उपक्रमाबाबत ॲड. महेश धन्नावत यांनी सांगितले की, अशिमा मित्तल यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेऊनही त्यांनी स्वतःच्या करिअरपेक्षा लोकसेवेला प्राधान्य दिले. गावागावांत जाऊन सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेणे, जलसंवर्धनासाठी प्रयत्न करणे आणि जालनाकरांसाठी उद्यानांचा विकास करणे ही त्यांची कार्यशैली प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव केल्याने शाळेतील मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती समाजसेवेतून साकार करण्याची प्रेरणा मिळेल. समाजाला अशा अनेक अशिमा मित्तल घडविण्याची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय अग्रवाल संमेलनाचे महाराष्ट्र विभागाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामचरण अग्रवाल (बंसल) आणि संघटन मंत्री श्री शीतलजी केडिया हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जालना शाखेच्या अध्यक्षा श्रीमती सावित्रीजी मल्लावत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय अग्रवाल संमेलनाचे मराठवाडा विभाग संयोजक श्री श्लोक जगदीश अग्रवाल यांनी केले आहे. अग्रवाल समाजातील बंधू-भगिनींमध्ये स्नेह, एकोपा आणि संघटनात्मक भावना दृढ करणे, तसेच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या स्नेह मिलन व सत्कार सोहळ्यास जालना शहरासह परिसरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्री श्लोक अग्रवाल यांनी केले आहे.
हे वृत्त वाचा: हिंदी | English
सीधे अपनी Facebook फ़ीड में पाएँ — News Nation Online पेज को Follow करें।
Discover more from NewsNation Online
Subscribe to get the latest posts sent to your email.












Leave a Reply