NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

गणेश महासंघाचा मोठा निर्णय! दुर्गा उत्सव समितीच्या प्रकल्प अध्यक्षपदी अमोल बांगड; नारीशक्तीचा होणार विशेष गौरव

दुर्गा उत्सव समितीचे प्रकल्प अध्यक्ष अमोल बांगड
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

जालना | प्रतिनिधी : आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील श्री गणेश महासंघाने संघटनात्मक विस्ताराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत दुर्गा उत्सव समितीच्या प्रकल्प अध्यक्षपदी युवा उद्योजक अमोल बांगड यांची नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती महासंघाचे अध्यक्ष श्लोक अग्रवाल आणि महासचिव भूषण यादव यांनी जाहीर केली.

या वर्षीच्या दुर्गा उत्सवात नारीशक्तीच्या विविध गुणांचा विशेष गौरव करण्याची संकल्पना महासंघाचे कार्याध्यक्ष ॲड. महेश धन्नावत यांनी मांडली. अध्यक्ष श्लोक अग्रवाल आणि महासचिव भूषण यादव यांनी या संकल्पनेला संमती दिली असून तिच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रकल्प अध्यक्ष म्हणून अमोल बांगड यांनी स्वीकारली आहे.

या संकल्पनेत दुर्गा ही नेतृत्व आणि संरक्षणाची, काली ही अन्यायाविरुद्ध लढण्याच्या धैर्याची, तर सरस्वती ही ज्ञान, शिक्षण आणि विवेकाची प्रतीके मानण्यात आली आहेत.

नवदुर्गेच्या नऊ रूपांतून शौर्य, संयम, करुणा, बुद्धिमत्ता, नेतृत्व, संरक्षण, त्याग, आत्मविश्वास आणि सृजनशीलता या गुणांचा संदेश दिला जातो. या गुणांच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा दुर्गा उत्सव समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या वेळी श्री गणेश महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. शिवदत्त विजयसेनानी, आनंद बंब, गौरव बोरा, युवा उद्योजक अर्जुन पित्ती, मार्गदर्शक बाबा नंद, माजी अध्यक्ष रोहित भुरेवाल, कमलेश खरे, दुर्गेश कटोटीवाले यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw

Discover more from NewsNation Online

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading