• Home
  • अंबड मधील महात्मा फुले चौकात ओबीसी बांधवांची घोषणाबाजी.

अंबड मधील महात्मा फुले चौकात ओबीसी बांधवांची घोषणाबाजी.

anews Banner
छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने अंबड शहरांमध्ये उमटले पडसाद..After Chhagan Bhujbal withdrew from the Lok Sabha elections, there was an uproar in Ambad cities.
नवीनच उगम पावलेल्या स्वयंघोषित नेत्याचा प्रस्थापित नेत्यांवर दबाव असल्याने भुजबळ यांच्या उमेदवारीवर गदा; जरांगे पाटलांच नाव न घेता ओबीसी समन्वयकाचा आरोप..
ओबीसी समन्वय समिती प्रचंड आक्रमक, घोषणाबाजी करत केले निषेध आंदोलन..

जालना:- नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील, अशी राज्यभरात चर्चा होती. मात्र भुजबळांनी माघार घेतल्याने नाशिक लोकसभा मतदार संघाचे राजकीय समिकरण बदलणार आहे हे निश्चित झाल आहे. भुजबळ यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अंबड शहरात ओबीसी समन्वय समितीने या निर्णयाचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला.

भुजबळ यांनी नाशिकमधून लढावं, असं वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या सुचना आसताना महाराष्ट्रातून प्रस्थापित नेत्यांच्या वतीने दबाव आणण्यात आला आणि भुजबळ यांना माघार घ्यावी लागली असं ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे. महिन्याभरापूर्वी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला असताना महायुतीचा मात्र उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही किंवा जाणून बुजून वेळ मारून नेण्यात आली.वेळ कमी असल्यामुळे आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रकार परिषदेद्वारे छगन भुजबळ यांनी जाहीर केले.

मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचः आंदोलन असेल किंवा ओबीसीची चळवळ असेल ही जालना जिल्ह्यामधूनच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राज्यातील प्रस्थापित नेत्यांवर जालन्यातील नवीन उगम पावलेल्या नेत्याचा दबाव असल्यानेच छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर गदा आणण्याचे काम केले असल्याचे जरांगे पाटलांच नाव न घेता त्यांच्यावर ओबीसी समाजाचे समन्वयक राजेंद्र खरात यांनी आरोप केले.

यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माणा झाला आसून त्याची ठिणगी जालन्यातून पडली आहे. केंद्राच्या नेत्यांकडून भुजबळ यांना लोकसभेसाठी ग्रीन सिग्नल मिळालेले असताना राज्यातून दबाव तंत्राचा वापर करून भुजबळ यांच्या उमेदवारीस अंतर्गत विरोध निर्माण झाल्याने आणि दबाव तंत्र वापरल्याने छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचा आरोप ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी केला.

ओबीसींच्या आवाज दाबण्यासाठीचा हा राज्यातील प्रस्थापित नेत्यांचा प्रयत्न असल्याचाही आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

या विरुद्ध आज अंबड शहरांमध्ये ओबीसी समन्वय समितीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपण यापुढेही छगन भुजबळ यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले
यावेळी रवींद्र खरात, शरद राठोड, रामशेठ लांडे, गोपी घायाळ, आकाश रहाटगावकर, संतोष राऊत, दत्ता ठोके, बाबासाहेब घोलप, शोएब बिल्डर, समीर बिल्डर, परमेश्वर भागवत, लहू जाधव, सह ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..

After Chhagan Bhujbal withdrew from the Lok Sabha elections, there was an uproar in Ambad cities.