• Home
  • Loksabha election : छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी; दोन मोठ्या नेत्यांसमोर कसा लागणार निभाव?

Loksabha election : छत्रपती संभाजी नगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी; दोन मोठ्या नेत्यांसमोर कसा लागणार निभाव?

anews Banner

मुंबईः छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजी नगरसाठी शिवसेनेकडून कोण उमेदवार असेल, याचे तर्क लढवले जात होते. ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित केल्याने त्यांना लढत देणारा उमेदवार शिवसेनेने जाहीर केला आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेनेकडून लोकसभेच्या आखाड्यात असतील. संभाजी नगर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु २०१९ मध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. तिथे एमआयएमचे इम्तियाज जलील याचा विजय झाला होता.

यावेळी ठाकरे गटाकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इच्छूक होते. त्यांनी जाहीरपणे तशी मागणीदेखील केली होती. दुसरीकडे खैरेही इच्छूक होते. पक्षाने खैरेंना मैदानात उतरवलं. तरीही दानवेंनी नाराजी व्यक्त केली नाही. त्यानंतर खैरेंनी ही शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं.

शिवसेनेने शनिवारी मंत्री संदीपान भूमरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट, एमआयएम अशी तिरंगी लढत छत्रपती संभाजी नगरमध्ये बघायला मिळेल.

Loksabha election : Sandipan Bhumre nominated from Chhatrapati Sambhaji Nagar;  How will it be done in front of two big leaders?