• Home
  • जालन्याच्या भीमनगर भागात अज्ञात समाज कंटकांकडून बुद्ध विहारा जवळ दगडफेक.Stone pelting near Buddha Vihara by unknown community members in Bhimnagar area of Jalna.

जालन्याच्या भीमनगर भागात अज्ञात समाज कंटकांकडून बुद्ध विहारा जवळ दगडफेक.Stone pelting near Buddha Vihara by unknown community members in Bhimnagar area of Jalna.

anews Banner
आपसी मतभेदांतून करण्यात आली दगड फेक..
घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र काही नागरिक जखमी..
जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू..
वंचित बहुजन आघाडीने केला घटनेचा निषेध..
ज्याने दगड फेक केलीय त्याला तत्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांची मागणी..

जालना शहरातील रामनगर परिसरातील भीम नगर भागात काही समाज कंटकांकडून बुद्ध विहार परिसरात दगड फेक करण्यात आलीय. आपसी मतभेदांतून ही दगड फेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना दि, 17- बुधवार रोजी रात्री 08:00 वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये, मात्र काही नागरिक जखमी झालेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून वंचित बहुजन आघाडीने केला घटनेचा निषेध केलाय. वंचित बहुजन आघाडी भीम नगर भागातील नागरिकांच्या पाठीशी खंबीर पने उभी असून ज्याने दगड फेक केलीय त्याला तत्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे केलीय.

आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिले. सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनीही भेट दिली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहे

Stone pelting near Buddha Vihara by unknown community members in Bhimnagar area of Jalna.