NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

बाहेरचा रावण जाळणे सोपे, आतला रावण जाळा – Adv. महेश धन्नावत यांचे जालनेकरांना कळकळीचे आवाहन

दहा मुखांचा रावण दहन आणि आतला रावण जाळा संदेश
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

जालना – दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. दरवर्षी आपण मैदानात रावणाचा पुतळा जाळतो, पण खरा रावण तर आपल्या मनातच बसलाय, या शब्दांत Adv. महेश धन्नावत यांनी यंदा जालनेकरांना अंतर्मुख केले आहे.

दशहरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना Adv. धन्नावत म्हणाले की, सणांचा खरा अर्थ दिखाव्यात नाही तर आत्मपरिवर्तनात आहे.

Adv. महेश धन्नावत म्हणाले –

रावणाला दहा तोंडे होती, म्हणून आपण त्याला दशानन म्हणतो. पण आज प्रत्येक माणसाच्या मनातही रावणाची दहा तोंडे जिवंत आहेत. जोपर्यंत ती जिवंत आहेत, तोपर्यंत बाहेर कितीही पुतळे जाळले तरी विजयादशमी साजरी होणार नाही.

यंदा आपण ठरवूया, आपल्यातील रावणालाच संपवायचे. माझ्या सर्व जालनेकर बांधवांना माझी विनंती आहे, यंदा स्वतःमध्येच या दहा गोष्टींचे दहन करा –

  1. अहंकार जाळा
  2. क्रोध जाळा
  3. मत्सर – दुसऱ्याबद्दलचा जळाऊपणा जाळा
  4. लोभ – अमर्याद हव्यास जाळा
  5. मोह – चुकीच्या आकर्षणाला जाळा
  6. मद – सत्ता आणि पैशाचा गर्व जाळा
  7. द्वेष – मनातील कटुता जाळा
  8. स्वार्थ – फक्त माझेच खरे, ही वृत्ती जाळा
  9. असत्य – खोटेपणा जाळा
  10. हिंसा – दुसऱ्याला दुखवण्याची वृत्ती जाळा

ही दहा तोंडे जळाली की माणूस खऱ्या अर्थाने माणूस होतो. हाच खरा दसरा आहे. मैदानातला रावण जळून राख होतो, पण मनातला रावण जळाला तर आयुष्याचे सोने होते.

Adv. धन्नावत यांच्या या हृदयस्पर्शी विचारांना जालनेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, “आतला रावण मारा” हा संदेश सध्या चर्चेचा विषय बनला आहे.


Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw Lawyer.

Leave a Reply

Discover more from NewsNation Online

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Verified by MonsterInsights