NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

श्री दुर्गा उत्सव समितीतर्फे विविध क्षेत्रातील 37 महिलांचा सन्मान

जालना श्री दुर्गा उत्सव समिती नारी शक्ती सन्मान सोहळ्यात सन्मानित महिला व मान्यवरांचे समूह छायाचित्र
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

*श्री दुर्गा उत्सव समितीतर्फे विविध*

*क्षेत्रातील 37 महिलांचा सन्मान*

==============

दिवाळीला काटकसर करून उरलेल्या पैशातून गरजूंना आधार द्या–वर्षा पित्ती

=================

*जालना/प्रतिनिधी* : श्री दुर्गा उत्सव समिती, जालनाच्यावतीने रविवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी महेश भवन येथे आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील 37 कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी श्री दुर्गा उत्सव समितीचे प्रकल्प अध्यक्ष अमोल बांगड होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती सौ. वर्षा सुरेंद्र पित्ती, माजी नगराध्यक्ष सौ. संगीताताई गोरंट्याल, सौ. संध्या देठे, उपसभापती पद्मा अजित मानधने, पुनम राज स्वामी, कदी म जालना ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांची उपस्थिती होती.

Never miss a storyFollow News Nation Online on WhatsApp for breaking news from India and the world.
Follow on WhatsApp

या कार्यक्रमात वर्षा पित्ती, संगिता गोरंट्याल, काजल पटेल, पूनम स्वामी, संध्या देठे, माया जोशी, पद्मा मानधने, निता काबरा, मिनाक्षी दाड, अनया अग्रवाल, प्रतिभा श्रीपत, संजीवनी खालापुरे, सीताबाई मोहिते, ॲड. अश्विनी धन्नावत, रसना देहेडकर, प्रिती कचरे, मिता पित्ती, भारती विजयसेनानी, सपना गर्ग, सुनंदा बदनापूरकर, ॲड. श्वेता कोठारी, पोर्णिमा फोफलिया, कविता खरे, शोभा विजयसेनानी, पूजा भगत, ज्योती चोरडिया, वैशाली बंब, संगिता कऱ्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, वृषाली नानावटी, तेजल साळवे, इंजि. सुरश्री अय्यर, सवितादेवी मल्लावत, ॲड. रत्ना दिपवाल-यादव, कु. श्वेता बागडी आदी 37 महिलांचा गौरव करण्यात आला. महापौर वंदना मगरे, मनीषा टोपे आणि सत्कारमूर्ती नगरसेविका सुशीला दानवे या काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

सत्काराला उत्तर देताना सौ. वर्षा पित्ती यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे उपस्थित महिलांचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, या परिस्थितीत सण साजरे करताना आपण संवेदनशील राहिले पाहिजे. काटकसर हा तर महिलांचा उपजत गुण आहे. या परिस्थितीत कमीत कमी खर्च करून, यंदा दिवाळीला एक साडी कमी घेतली तरी चालेल. त्यातून उरलेल्या पैशातून आपल्या आजूबाजूच्या गरजूंना मदत करावी. आपल्या छोट्याशा त्यागातून एखाद्या कुटुंबाची दिवाळी गोड होऊ शकते. दिवाळीचा आनंद गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. यावेळी संगीताताई गोरंट्याल, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात निमंत्रक अमोल बांगड म्हणाले की, भारतीय संस्कृतीत नारी ही केवळ कुटुंबाचा आधार नसून संपूर्ण समाजाच्या प्रगतीची आधारशिला आहे. आजची महिला व्यवसाय, शिक्षण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करत राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देत आहे. हा सत्कार सोहळा केवळ सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या संघर्ष, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाला सलाम करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. महिलांचा खरा सन्मान हा त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान हक्क, संधी आणि निर्णयस्वातंत्र्य देऊनच शक्य होईल. त्यामुळे प्रत्येकीला सुरक्षित, सन्मानित व आत्मनिर्भर वाटेल असा सशक्त समाज घडवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया.

कार्यक्रमाला संजयकुमार दाड, दामोदर बजाज, दिलीप चेचानी, विजय राठी, उमेश बजाज, श्लोक अग्रवाल, दिनेश भगत, आनंद बंब, पवन जोशी, सचिन मोहता, अर्जुन पित्ती, डॉ. शिवदत्त विजयसेनानी आदी मान्यवरांसह नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती सावजी आणि प्रा. स्वप्निल सारडा यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार ॲड. महेश धन्नावत आणि भूषण यादव यांनी मानले.

हे वृत्त वाचा: हिंदी | English

जालना, महाराष्ट्र और देश-दुनिया की ताज़ा खबरें
सीधे अपनी Facebook फ़ीड में पाएँ — News Nation Online पेज को Follow करें।
👍 Facebook पर Follow करें

Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw Lawyer.