NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

जालन्यात नारीशक्तीचा गौरव! १८ ऑक्टोबरला श्री दुर्गा उत्सव समितीचा सन्मान सोहळा

श्री दुर्गा उत्सव समिती जालना नारी शक्ती सन्मान सोहळा बॅनर
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

जालना/प्रतिनिधी : श्री दुर्गा उत्सव समिती, जालनाच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महेश भवन येथे नारी शक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.

‘नारी शक्ती – समाजाची प्रगती, देशाची समृद्धी’ हा संदेश कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे. महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला सन्मान मिळावा आणि समाजातील इतर महिलांना व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे निमंत्रक तथा श्री दुर्गा उत्सव समितीचे प्रकल्प अध्यक्ष अमोल बांगड यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष श्लोक जगदीशजी अग्रवाल, महासचिव भूषण नंद यादव, कार्याध्यक्ष ॲड. महेश धन्नावत, मार्गदर्शक बाबा भैय्या नंद, माजी अध्यक्ष रोहित भैय्या भुरेवाल, उपाध्यक्ष गौरव बोरा, डॉ. शिवदत्त विजयसेनानी आणि आनंद बंब, विशेष सदस्य अर्जुन पित्ती, उमेश बजाज, स्वप्नील सारडा, सचिन मोहता व पवन जोशी.

Never miss a storyFollow News Nation Online on WhatsApp for breaking news from India and the world.
Follow on WhatsApp

समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही नागरिकांना या सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमस्थळ : महेश भवन, जालना. दिनांक : रविवार, १८ ऑक्टोबर २०२६. वेळ : दुपारी ३ वाजता.

हे वृत्त वाचा: English | हिंदी | ગુજરાતી | తెలుగు

जालना, महाराष्ट्र और देश-दुनिया की ताज़ा खबरें
सीधे अपनी Facebook फ़ीड में पाएँ — News Nation Online पेज को Follow करें।
👍 Facebook पर Follow करें

Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw Lawyer.